फुले महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन

फुले महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते तर, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर, अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी महात्मा फुले यांच्या जीवन व कार्य व प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी प्रो.डॉ. अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, प्रो. डॉ.ए.एस. मोरे, ग्रंथपाल प्रा.परमेश्वर इंगळे, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. डी. एन. माने, डॉ. संतोष पाटील यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!