मयत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे अहमदपूर पोलीसांचे आवाहन
अहमदपूर (प्रतिनिधी) : येथील पोलीसांनी एका मयत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन केले असून संबंधीतांनी अहमदपूर पोलीस स्टेशनला माहीती कळवावी असे पोलीसांच्या वतीने सांगण्यात आले आहे. याविषयी अहमदपूर पोलीसांकडून मिळालेलेली माहिती अशी की एक अनोळखी मयत यास दिनांक 23/ 10 /2022 रोजी थोडगा रोड, अहमदपूर येथील भारत फर्निचर दुकानाची समोरून 108 या अंब्युलन्सने शासकीय दवाखाना, अहमदपूर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर सदर अनोळखी मयतास दिनांक 31/10/2022 रोजी 17. 00 वाजता शासकीय दवाखाना अहमदपूर येथून ॲम्बुलन्स ने शासकीय दवाखाना आंबेजोगाई येथे पुढील उपचारा करता दाखल केले असता सदर अनोळखी इसमावर उपचार चालू असताना तो दिनांक 01/11/2022 रोजी मयत झाला आहे. अंबाजोगाई येथील नगर परिषदेचे सफाई कामगार यांचे मार्फतीने अंत्यविधी केला आहे. मयताचे प्राथमिक चौकशीचे पेपर पोलीस स्टेशन अहमदपूर येथे प्राप्त झाल्याने पोलीस स्टेशन अहमदपूर येथे अकस्मात मृत्यू नं. 65/22 कलम – 174 प्रमाणे दाखला असून पुढील तपास पोना/1695 ठाकरे हे करीत आहेत. सदरील मयत अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे अहमदपूर पोलीसांनी आवाहन केले असुन याबाबत नागरीकांकडे या मयता विषयी काही माहीती असेल तर अहमदपूर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
