उप शहर प्रमुख पदी शिवकुमार बेद्रे व तालुका सहसचिव पदी नरसिंग उर्फ पद्माकर पेंढारकर यांची निवड
अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मराठवाडा समन्वयक श्री विश्वनाथ नेरूळकर यांच्या आदेशाने शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख भारत सांगवीकर शहर प्रमुख शिवा कासले तालुका संघटक प्रा. संतोष रोडगे व चिंतामणी एवंदेगे यांच्या हस्ते उपशहरमुख प्रमुख पदी शिवकुमार बेद्रे व तालुका सहसचिव नरसिंग उर्फ पद्माकर पेंढारकर यांची निवड शिवनेरी शिवसेना कार्यालय थोडगा रोड राजूर येथे सकाळी 11 .30 निवड करण्यात आली. यावेळी शिवसेना नगरसेवक संदीप चौधरी शिवसेना कार्यालय प्रमुख सुभाष गुंडिले उपशहर प्रमुख शिवा भारती बालाजी पडिले तसेच गणेश कासनाळे, सोपान हाके, बापूअण्णा गुंडिले, शेख फारुख, मनोज कांबळे अमोल मोरे ,धनराज घोरपडे, लखन वाघमारे, नितीन मस्के, विजय कदम सुनील कदम, शरन चंदवाड, ओम कडवादे माणिक गुटे, नागेश गोडबोले शरद पोतले गोविंद उमाटे, सावन तोगरे पुंडलिक कदम, विनायक सूर्यवंशी शरद पोतले आदि उपस्थित होते.
