अहमदपूर तालुक्यातील नागझरीचं पुढचं पाऊल, विधवा प्रथा बंदीचा ठराव

अहमदपूर तालुक्यातील नागझरीचं पुढचं पाऊल, विधवा प्रथा बंदीचा ठराव

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील नागझरी या गावात महिलांच्या पुढाकारानं नुकतीच ग्रामस्थांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत महिलांच्या सन्मानासाठी विधवा प्रथा रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तर, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देण्याचं ठरलं. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाडपासून सुरु झालेल्या विधवा प्रथा बंदीच्या निर्णयाला राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. हेरवाड पाठोपाठ विविध जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा रद्द करण्याचे ठराव मंजूर केले आहेत. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागानं देखील विधवा प्रथा बंदीचे ठराव करण्याचं आवाहन ग्रामपंचायतींना केलं होतं. अहमदपूर तालुक्यातील नागझरी या ग्रामपंचयातीनं देखील विधवा प्रथा रद्द करण्याचा ठराव मंजूर केला आहे. महिलांच्या पुढाकारानं हा ठराव मंजूर करण्यात आला. विधवा प्रथा रद्द करण्याच्या ठरावासोबत महिलांना विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देण्याचा कृतीशील निर्धार देखील महिलांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत घेण्यात आला.

सरपंच रामकिशन एकनाथ सुर्यवंशी यांच्या अधक्षेतेखली नुकतीच ग्रामसभा पार पडली. विधवा महिलांना विवाहित महिलां प्रमाणेच सन्मानपूर्वक सण समारंभ आणि शुभ कार्यात सहभागी करून घेणे बाबतचा प्रस्ताव कविता नागनाथ उगिले यांनी मांडला आणी या प्रस्तावाला अनुमोदन रुक्मिणीबाई ज्ञानोबा इप्पर (ग्रा.पं. सदस्य) यांनी हात उंचाऊन पाठींबा दिला.

यावेळी उपसरपंच उद्धव ज्ञानोबा इप्पर, रुक्मिणी संजय मुंढे (ग्रा.पं. सदस्य), सुनिता नागनाथ अलापूरे (ग्रा.पं. सदस्य), नाथराव संतोबा इप्पर (ग्रा.पं. सदस्य), चंद्रकला विजय इप्पर (ग्रा.पं. सदस्य), अंकूश दौलत इप्पर सोसायटी चेरमन तसेच गावातील सर्व महिला, पुरुष, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक शिवाजी कोल्हे यांची उपस्थिती होती. इ.सन 2021 पासुन या ग्रामपंचयती तर्फे असे अनेक धाडशी निर्णय घेण्यात आले आहेत. जसे की गावात दारु विकणे, दारू पिऊन शिव्या देणे, बायका मुलांना त्रास देणे, गावात डाव (पत्ते) खेळणे या गोष्टीवर ग्रामपंचायतच्या वतीने ठराठ घेऊन बंदी आणली असुन ती 100% पाळली जाते. नागझरी ग्रापंचायतीला मार्गदर्शन व चांगल्या कामासाठी प्रोत्साहन गावचे भूषण तसेच भुमिपुत्र मंचक ज्ञानोबा इप्पर, आय.पी.एस ( डी आय जी) हे करतात.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!