तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत लालबहादुर शास्त्री शाळेचे घवघवीत यश
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शामलाल विद्यालय, उदगीर येथे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी व लंगडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला.
विजेत्या कबड्डी संघामध्ये चि. आझाद शेख ,सखाराम पवार, तुषार राठोड, रुद्र रोंगे, प्रथमेश देवकते, आदिराज तरगुडे,सोहम बुर्ले, प्रज्वल शिरसे व रुद्राक्ष जावरे यांनी सहभाग घेतला होता, तर मुलींच्या लंगडी स्पर्धेमध्ये कु.नंदिनी मुसळे, समृद्धी पाटील, राघवी मठपती, नंदिनी गव्हाणे, सिद्धी जोशी, नंदिनी कुमठेकर, प्रत्युषा पुरी, वेदश्री खोंडे व आदिती जाधव ,तसेच राखीव म्हणून कांबळे वसुंधरा,कांबळे अपूर्वा व चापुले गौरी यांनी सहभाग घेतला होता.
विजेत्या दोन्ही संघाचे भा.शि.प्र.प्र.संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य.स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह तथा भा.शि.प्र.संस्था केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव लासुणे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार,शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी दोन्ही संघातील विद्यार्थ्यांचे यश संपादन केल्याबद्दल अभिनंदन व कौतुक केले.
