रंजिता सांडवे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश
उदगीर (एल.पी.उगीले) : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे विचार,भारतीय जनता पार्टी चे ध्येय धोरण, माजी आमदा सुधाकरजी भालेराव यांच्या नेत्रत्वावर विश्वास ठेऊन भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला या वेळी भाजपा उदगीर शहर अध्यक्ष मनोज पुदाले यांच्या प्रमुख उपस्थितीत, महिला मोर्च्या च्या उत्तरा कलबुर्गे यांच्या सहकार्याने प्रवेश घेतला. यावेळी नगर सेवक ॲड. दत्ता पाटील,युवा मोर्च्या तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे, सरचिटणीस आनंद बुंदे,आनंद साबणे,नगर सेवक रामेश्वर पवार,जिल्हा उपाध्यक्ष धनराज बिरादार ,सुनील सावळे,महिला मोर्च्या जिल्हा सचिव अनिता बिरादार इत्यादी उपस्थित होते.
