इनरव्हील क्लब तर्फे संस्कार विद्यालयात खेळाचे साहित्य वाटप

इनरव्हील क्लब तर्फे संस्कार विद्यालयात खेळाचे साहित्य वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील इनरव्हील क्लबने संस्कार विद्यालय येथील मुलांसाठी विविध खेळांचे साहित्य वाटप केले. मुलांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकास ही व्हावा, यासाठी तसेच मैदानी खेळांची आवड असणाऱ्या मुलांना त्या खेळासाठी वाव मिळावा. यासाठी इनरव्हील क्लबने मैदानी खेळाचे साहित्य वाटप केले.

या प्रोजेक्टच्या प्रमुख सौ.योजना चौधरी या होत्या. या प्रोजेक्टच्या यशस्वीतेसाठी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा मीरा चेंबुले, सचिव शिल्पा बंडे, कोषाध्यक्ष मानसी चन्नावार, आय एस ओ स्नेहा चणगे, संपादक पल्लवी मुक्कावार तसेच इतर सदस्य नेहा जैन, आशा देवने, तुलसी देशमुख, रोहिणी चाटे यांनी प्रयत्न केले.

यावेळी संस्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक हरकरे , मुंडे , चामंतवार , श्रीमती मजगे , कलबुर्गे , व मठपती यांचेही सहकार्य लाभले.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!