महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार व डॉ. सतीश ससाणे यांचा सत्कार

महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार व डॉ. सतीश ससाणे यांचा सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : अमेरिकेतील नामांकित सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका या विद्यापीठाच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ अर्थात ‘डी. लिट्.’ या मानद डाॅक्टरेट पदवीने सन्मानित झाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांचा किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा प्रगतशील शेतकरी डॉ. बळीराम पवार यांनी शाल, पुष्पहार देऊन सत्कार केला.
यावेळी दै. सकाळचे पत्रकार प्रा. रत्नाकर नळेगावकर , वीरभद्र स्वामी , दैनिक लोकमतचे पत्रकार संजीव कुमार देवनाळे यांनीही दोन्ही मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार डॉ. मारोती कसाब यांनी व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!