चिमाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, प्रशासनाच्या वतीने सत्कार संपन्न

चिमाचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध, प्रशासनाच्या वतीने सत्कार संपन्न

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका सुरू असून उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी, चिमाचीवाडी या गावातील नागरिकांनी एकमताने सरपंच पदासह एकूण सात सदस्य बिनविरोध निवडून आणले आहेत. यामध्ये सरपंच म्हणून दुर्गावाड मीरा पंढरी या बिनविरोध आल्या आहेत. तसेच बिनविरोध सदस्य म्हणून गुंडीले रामदास किशन, चंदे सुनंदा हरिदास, जाधव कालिंदी वामन, बंडे प्रशांत गोपीनाथ, गुनाले रंजना नामदेव, गुरमे अनिल माधवराव, दुर्गावाड मीनाक्षी प्रमोद यांचा समावेश आहे.

प्रशासनाच्या वतीने राज्य निवडणूक प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या हस्ते सर्वांचा यशोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे, संतोष धाराशिवकर, विकास सहकारी साखर कारखान्याचे संचालक कल्याण पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी दंडे व्ही आर ,सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी काळे एम पी, मंडळ अधिकारी गणेश हिवरे, तलाठी शंकर जाधव, कुलदीप गायकवाड, अमोल रामशेट्टी, पवार देवप्रिय, बाबासाहेब कांबळे इत्यादी जण उपस्थित होते. तालुक्यातून चिमाचीवाडी हे गाव आदर्शगाव म्हणून ओळखले जात असून शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम राबवण्यामध्ये सदैव अग्रेसर असणारे गाव आहे, अशी सर्वत्र ओळख आहे.

About The Author

error: Content is protected !!