तालुक्यातील 26 ग्रामपंचायत पैकी सरपंच पदाच्या 42 तर सदस्य पदाच्या 92 उमेदवारांनी अर्ज परत घेतले
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका चालू असून, उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदाच्या 42 उमेदवारांनी तर सदस्य पदासाठी 92 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज परत घेतले आहेत. तालुक्यामध्ये अनेक ग्रामपंचायत मध्ये सरळ सरळ लढत आहेत, तर काही ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. अपवादात्मक स्थितीमध्ये चौरंगी लढत ही पाहायला मिळणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायतचे चित्र असे, मोघा ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 23 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. रावणगावातून सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 25 जण उमेदवारी कायम ठेवून आहेत. शंभू उमरगा येथे सरपंच पदासाठी सरळ लढत असून दोन उमेदवार सरपंच पदासाठी तर 18 उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदासाठी लढणार आहेत. वायगाव ग्रामपंचायत मध्ये देखील सरपंचाची सरळ लढत असून सदस्य पदासाठी 19 जण आहेत. हैबतपुर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 22, तिवटग्याळ येथे सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 14 उमेदवार आहेत. बनशेळकी येथे सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 27 जणांची उमेदवारी आहे. नेत्रगाव मध्ये सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 14 जण इच्छुक आहेत. तोंडार गावातून सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 32 उमेदवार कायम आहेत.
शेकापूर ग्रामपंचायत मधून सरपंच पदासाठी दोन आणि सदस्य पदासाठी 23 उमेदवार नशीब आजमावत आहेत. तोंडचिर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 32 जण या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उदगीरचे उपनगर म्हणून ओळखले जाणाऱ्या सोमनाथपूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी सहा तर सदस्य पदासाठी 44 उमेदवार रिंगणात आहेत. नागलगाव येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 28 उमेदवार शिल्लक आहेत. तोगरी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 28 सदस्य उमेदवार कायम आहेत. देवर्जन ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी चार तर सदस्य पदासाठी 26, डिग्रस येथे सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 26, साताळा येथे सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 24 उमेदवार आहेत. मलकापूर ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 28 जणांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत.
नावंदी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 19 उमेदवार शिल्लक आहेत. सुकणी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 17 उमेदवार शिल्लक आहेत. चोंडी ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी दोन तर सदस्य पदासाठी 18 उमेदवार शिल्लक आहेत. देऊळवाडी येथे देखील सरपंच पदासाठी दोन आणि सदस्य पदासाठी 18 उमेदवार शिल्लक आहेत. कल्लूर येथे सरपंच पदासाठी तीन तर सदस्य पदासाठी 15, उमरगा मन्ना येथे सरपंच पदासाठी तीन आणि सदस्य पदासाठी 14 जणांची लढत लढत होणार आहे. मोर्तळवाडी(हा.) येथे सरपंच पदासाठी दोन आणि सदस्य पदासाठी सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
चिमाचीवाडी या गावातून बिनविरोध निवड झाल्यामुळे विजयी उमेदवारांचे स्वागत आणि सरकार करण्यात आला. इतर गावातील निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही. यासाठी महसूल प्रशासन सज्ज असून सर्व पूर्व तयारी पूर्ण झाली असल्याचेही सांगण्यात येत आहे. तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर आणि त्यांचे सहकारी सर्व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत आचारसंहिता पाळली जाईल. यासाठी सक्रिय असल्याचेही सांगितले जात आहे.
