जिव्हाळा ग्रुप उदगीरच्या वतीने पत्रकार दैनिक राजधर्मचे श्री आलमखाने यांचा हृद्य सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील जेष्ठ पत्रकार अंबादास आलमखाने यांचा जिव्हाळा ग्रुपच्या वतीने अध्यक्ष देविदासराव नादरगे यांनी केला.
पत्रकारिता ही पारदर्शक असावी. समाजाच्या सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी व त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम आलामखणे हे सतत करीत असतात.त्याबद्दल विश्वनाथराव मुडपे राष्ट्रीय पुरस्कार विजेते शिक्षक यांनी आलामखाने यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रमाकांत बनशेळकीकर यांनी केले. आलमखाने यांनी सत्काराला उत्तर देताना जिव्हाळा ग्रुप उदगीरच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला.आपल्या सामाजिक कार्यास माझ्या परीने हातभार लावण्याचे अभिवचन दिले.
या कार्यक्रमात बोडके, दशरथराव शिंदे,सचीन बापुरे,हावगीराव आचारे, सोपानराव माने, सुभाष तगाळे, चंद्रकांत रोडगे, चंद्रकांत पांचाळ, राजेश बिरादार, अशोकराव बिरादार, लक्ष्मीकांत बिडवयी व वैजनाथराव पंचगल्ले जिव्हाळा ग्रुप उदगीरचे सर्व सदस्य उपस्थित होते.
