शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करा मनसेचे तहसीलदारांना निवेदन

शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा मंजूर करा मनसेचे तहसीलदारांना निवेदन

देवणी (प्रतिनिधी) : देवणी तालुक्यातील अनेक शेतकरी हे पीक विम्यापासून वंचित असून काहींना अत्यल्प विमा मिळाला आहे तर काही शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पिक विमा पासून दूर ठेवले आहे याचे नेमके कारण काय हे कळायला मार्ग नाही एकूण विमा कंपनीच्या ही मनमानी असून त्याचा निषेध करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुकाध्यक्ष सोमनाथ कलशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज तहसीलदारांना निवेदन दिले.मागणी मान्य नाही झाली तर तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.यावेळी सखाराम म्हेत्रे,सखाराम कापडे, ज्ञानेश्वर बिराजदार,बिराजदार महादेव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!