आमदार संजय बनसोडे यांच्याकडून चिमाचीवाडी ग्राम पंचायतीला दहा लाख रुपयाचा निधी जाहीर

आमदार संजय बनसोडे यांच्याकडून चिमाचीवाडी ग्राम पंचायतीला दहा लाख रुपयाचा निधी जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या असून तालुक्यातुन बिनविरोध येणाऱ्या ग्राम ग्रामपंचायतीला आ. संजय बनसोडे यांच्याकडून दहा लाख रुपयांचा निधी निवडणुकीच्या अगोदर जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायती पैकी उदगीर तालुक्यातील एकमेव चिमाचीवाडी या गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध निघाल्याने आ. संजय बनसोडे यांच्याकडून त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाचा सत्कार करून त्यांना दहा लाख रुपयांचा निधी देण्याचे जाहीर केले.

यावेळी आ. संजय बनसोडे यांनी बिनविरोध निघालेल्या चिमाचीवाडी येथील सरपंचाचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पेढा भरऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी जळकोट नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ.प्रभावती कांबळे, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, अभिजीत औटे, माजी सरपंच नाथराव भंडे, आदी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!