कुऱ्हाडीच्या तुंब्याने जखमी करून जीवे मारण्याची धमकी, चौघाजनावर गुन्हा
हुकूमत शेख (वाढवणा बु) : हंडरगुळी येथील फिर्यादी सुदर्शन बालाजी आष्टुरे रा. हंडरगुळी यांच्या घराच्या सामायिक कपाउंड भिंत बांधण्याच्या कारणावरून फिर्यादी व वडिलांना दगडाने मारून मुक्का मार दिला. तसेच फिर्यादीच्या आईला कुऱ्हाडीच्या तुंब्याने मारून जखमी करून शिवीगाळ करून जीवेमारण्याची धमकी दिली, म्हणुन वाढवणा पोलीस स्टेशन मध्ये फिर्यादीने पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिल्यामुळे आरोपी दत्तात्रय चांगदेव आष्टुरे, सविता दत्तात्रय आष्टुरे, कैलास दत्तात्रय आष्टुरे, चंद्रशेखर दत्तात्रय आष्टुरे सर्व रा. हंडरगुळी तुमच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामगल्ली हंडरंगुळी फिर्यादीच्या घरासमोर येउन दगड, कुऱ्हाडीच्या तुंब्याने वरील आरोपीतानी संगमत करून मारहाण करून जखमी केले.तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्यावरून वाढवणा पोलीस स्टेशन आरोपीतावर गु र नं 201/2022 कलम 326,324,323,504,506,34 भारतीय दंड विधान संहिता प्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नौशाद पठाण यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास बळदे करीत आहेत.
