लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले): येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालय विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम राबवत असते.शैक्षणिक सहलीतून‌ विद्यार्थ्यांना सांस्कृतिक, भौगोलिक, ऐतिहासिक स्थळांची माहिती होते.त्यांच्या ज्ञानात भर पडते,प्रवासातील अनुभव कळतात, म्हणून कोरोना लॉकडाऊनच्या दोन वर्षानंतर या वर्षी शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते.इयत्ता तिसरी,चौथी विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते.

शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिबा मंदिर, पन्हाळा,कनेरी मठ ,तसेच सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील सयाजीराचे पार्क इत्यादी स्थळांना भेटी देऊन माहिती सांगितली.
सहल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख सुधाकर पोलावार, सहप्रमुख अतुल गुरमे,श्याम गौंडगावे, बाळाराम बानापुरे,माधव केंद्रे, तुकाराम पेद्दावाड,सौ.श्रीदेवी कबाडे,सौ.भाग्यश्री स्वामी व प्रभाकर कबाडे यांनी मेहनत घेतली.
सहल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्रजी आलूरकर, कार्यवाह डॉ.हेमंतजी वैद्य, स्थानिक समन्वय समिती कार्यवाह तथा भा.शि.प्र.संस्था केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शंकरराव लासुणे, स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकर वट्टमवार, शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे व सर्व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

About The Author

error: Content is protected !!