यशवंत वसतिगृहातील भौतिक सोई-सुविधांचे उद्घाटन

यशवंत वसतिगृहातील भौतिक सोई-सुविधांचे उद्घाटन

संस्थेचे सहसचिव प्रणयन व अर्पिता चौधरी यांची विशेष उपस्थिती.
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील एकुरका रोड येथील शासन मान्य मुलांचे यशवंत वसतिगृह येथील भौतिक सोई-सुविधांचे उद्घाटन संस्थेचे सहसचिव प्रणयन प्रमोद चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्पिता प्रणयन चौधरी यांच्या हस्ते फित कापून व विधीवत पुजा करून बुधवारी करण्यात आले.

अध्यक्षस्थानी संस्थासचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून कांतादेवी व्यंकटेश चौधरी, ज्योतीताई प्रमोद चौधरी, प्रणयन प्रमोद चौधरी, प्रयास प्रमोद चौधरी आदींची उपस्थिती होती. यावेळी वसतिगृहातील मुलांसाठी उभारण्यात आलेल्या डबलडेकर बेड, हॉट वॉटर बॉयलर, पिण्याच्या पाण्याची टाकी व स्नानगृह आदींचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी समर्थ संकुलातील विविध विभागाच्या वतीने संस्था सहसचिव प्रणयन प्रमोद चौधरी व त्यांच्या सुविद्य पत्नी अर्पिता प्रणयन चौधरी यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. यासाठी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके, प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी.एस. बाबळसुरे, रसूल पठाण, वर्षा कवडगावे याच्यांसह वसतिगृहातील कर्मचारी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

About The Author

error: Content is protected !!