आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातून उदगीर शहराला मिळणार चौपदरीकरणाचा रस्ता
चार पदरी रिंग रोड साठी 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर
उदगीर (एल.पी.उगीले) : शहर हे आंध्रा,तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र या चार राज्याच्या सीमेवर असल्याने शहरात दिवसेंदिवस नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर म्हणून उदगीर शहराची ओळख आहे.लातूर शहराच्या नंतर उदगीर तालुका हा सर्वात मोठा तालुका म्हणून मराठवाड्यात ओळखला जातो.
उदगीर शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवुन सदर चार पदरी रिंग रोड होत असुन
या शहरात विविध ठिकाणाहून हजारो नागरिक दररोज ये – जा करत असतात, परिणामी शहरात वाहतुकीची कोंडी होत असल्याने उदगीर शहराला नांदेड ,बिदर, लातूर या तीन प्रमुख जिल्ह्याचा मार्ग जोडला असल्याने या शहरात दिवसेंदिवस होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उदगीर – जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उदगीर शहराच्या बाहेरून चार पदरी रिंग रोड करावा, म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून जवळपास 140 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.त्या चार पदरी रिंगरोडच्या रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्या सोबत आ. संजय बनसोडे यांनी बैठक घेऊन शहराच्या बाहेरून जाणारा चारपदरी रस्ता हा लवकरात लवकर करावा. अशा सूचना देवुन संबंधित अधिकाऱ्यांनी तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे तात्काळ पाठवून आपणास कळवावे. केंद्राकडे हा प्रस्ताव गेल्यानंतर मी स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे जाऊन विनंती करून या कामाला गती देण्याचे काम आपण करणार असल्याचे आ. संजय बनसोडे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या बैठकीत सांगितले.
यावेळी लातूर येथील राष्ट्रीय महामार्गाचे उपकार्यकारी अभियंता डी. टी. हावळे, शाखा अभियंता शफिक शेख, दिल्ली येथील रेडी मकॉम कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव कुमार, माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, आदी उपस्थित होते.
