पवार साहेबांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करा – भरत चामले

पवार साहेबांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करा - भरत चामले

उदगीर (एल. पी. उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रतिमा ही सर्वसामान्य गोरगरिबांचे नेते म्हणून आहे. बळीराजाला न्याय देणारा जाणता राजा म्हणूनही शरदचंद्रजी पवार साहेब यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा केला जाणार आहे. कार्यकर्त्यांनी या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघ उदगीरचे चेअरमन भरत तुकाराम चामले यांनी केले आहे.

पवार साहेबांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करा - भरत चामले

चेअरमन भरत चामले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्य करत आहेत, पवार परिवारातील एक घटक असल्यासारखे एकनिष्ठपणे राष्ट्रवादीचे कार्य ते प्रामाणिकपणे करत असतात. कोणताही राजकीय वारसा नसताना देखील केवळ वडिलांच्या आशीर्वादाने आणि आपल्यामध्ये असलेल्या संघटन कुशल नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहेत. अनेक वेळा स्थानिक पातळीवर दुसऱ्या पक्षातून आलेले कार्यकर्ते आपणच खरे निष्ठावान आहोत हे दाखवत भरत चामले यांना उपेक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कोणत्याही गोष्टीची तमा न बाळगता पवार साहेबांना दैवत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची सेवा आणि ८० टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण हे धोरण स्वीकारून खरेदी विक्री संघाच्या आणि पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. कोणी काही जरी म्हटले तरी त्याची तमा न बाळगता राष्ट्रवादीची सेवा करणे हाच आपला धर्म या भावनेने ते सतत कार्यरत असतात. याच प्रेरणेतून त्यांच्या वतीने व्यक्तिशः समाजातील सर्वसामान्य माणसांमध्ये आढळून येणाऱ्या नेहमीच्या तक्रारींचा विचार करून ज्यामध्ये प्रामुख्याने कमर दुखी, मधुमेह, शरीरामध्ये वाढलेली चरबी, अर्थात लठ्ठपणा, थायरॉईड, तसेच गुडघ्यामध्ये किंवा इतरही सांध्यामध्ये वयोमानामुळे किंवा अतिश्रमामुळे होणारा त्रास, त्यासोबतच रक्तदाब, सततची होणारी डोकेदुखी, सायटिका, लकवा, दमा, मानसिक तणाव, डोळे, कान यांचे त्रास, तसेच पचनाच्या संदर्भामध्ये सतत गॅस होणे, कब्ज होणे, बवासीरची समस्या अशा स्वरूपातल्या आजारांसाठी ॲक्युप्रेशर व्हायब्रेशन, सुजोक चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग आणि ट्रीटमेंट संस्थान जोधपुर (राजस्थान) येथील तज्ञ असलेले ख्यातनाम डॉक्टर्स संतोष गोस्वामी, राजकुमार, शर्मा हे मान्यवर थेरपीस्ट उदगीर येथे उपलब्ध राहणार आहेत. साई हॉस्पिटल, कल्पना टॉकीज जवळ शेल्हाळ रोड, उदगीर येथे राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 12 डिसेंबर ते 17 डिसेंबर २०२२ या कालावधीमध्ये सकाळी नऊ ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री आठ पर्यंत हे शिबिर चालणार आहे. सहा दिवसासाठी असलेल्या या शिबिरासाठी नाममात्र शुल्क आकारले जाणारा असून गरजूंनी मारुती बिरादार( 99 23 11 93 97), किंवा कल्पेश नवाडे (7972816301), किंवा दीपक फुले (91 75 57 32 50), सारंग जोशी (76 67 0 34570 ) या मोबाईल क्रमांकावर या शिबिरामध्ये सहभाग नोंदवण्यासाठी नोंदणी करणे गरजेचे असल्याने संपर्क साधावा. असेही आवाहन भरत तुकाराम चामले यांनी केले आहे. सदरील शिबिर हे पूर्णपणे ॲक्युप्रेशर चिकित्सा पद्धतीने संपन्न होणार असल्याने ज्यांना वरील प्रमाणे त्रास आहे, त्यांनी याचा लाभ घ्यावा. असेही आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!