संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश वेदांत कोनापुरे धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

संत ज्ञानेश्वर विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश वेदांत कोनापुरे धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम

अहमदपूर (गोविंद काळे) : दि. 6/12/2022 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या 400 मीटर धावणे स्पर्धेत शाळेचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी वेदांत भगवान कोनापुरे जिल्ह्यात प्रथम आला आहे. व त्याची पुढील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच उदय महागावकर लांब उडी मध्ये तालुक्यात प्रथम आला आहे. या यशा बद्दल संस्थाध्यक्ष मा. गणेश दादा हाके पाटील ,संस्था सचिव प्राचार्या रेखाताई तरडे तसेच विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, मुख्याध्यापक उद्धव शृंगारे यांनी अभिनंदन व कौतुक केले. या विद्यार्थ्याला क्रीडा शिक्षक नंदकुमार मद्देवाड यांनी मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. व पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

error: Content is protected !!