किलबिलचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात…!

किलबिलचे विज्ञान प्रदर्शन उत्साहात...!

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कूल मध्ये जीवन विज्ञान प्रदर्शन नुकतेच संपन्न झाले. आपल्या सभोवती विज्ञान चे चमत्कार आपण रोज पाहतो. त्यामागच्या जाणिवा जागृत होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन महात्मा गांधी महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. आर. के. कलमे यांच्या शुभहस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस पार्टी लातूर चे सरचिटणीस सांबप्पा महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विधीज्ञ अँड. हेमंत पाटील, जिल्हा परिषदचे माजी बांधकाम सभापती चंन्द्रकांत मद्दे, मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. गोविंद शेळके, माजी मुख्याध्यपक बाबुराव डावळे, लोक जागृती विद्यालय रापका येथील सेवानिवृत्त शिक्षक व्यंकटराव श्रीरसागर व विजयकुमार कल्याणकर ई. उपस्थित होते. प्रदर्शनात शाळेतील सर्वच विद्यार्थी सहभागी झाले होते. सामजिक वनीकरण महत्त्व, ट्रॅफिक सुरक्षा, ऑटो सेन्सर लॉक, सोलर एनर्जी, सेंद्रिय शेती, चंद्रग्रहण, आजीबाईचा बटवा, आरोग्यदायी फळं – भाजीपाला ई. अनेक विषयावर विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे संचालक ज्ञानोबा भोसले, सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी श्रेया गायकवाड आणि प्रणाली जगताप तर आभार प्राचार्य संतोष पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व स्टाफनी अपार मेहनत घेतली. विद्यार्थ्यांचे प्रयोग पाहून त्यांना कौतुकाची थाप देण्यासाठी पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

About The Author

error: Content is protected !!