किलबिल चे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश…
अहमदपूर (गोविंद काळे) :शिरूर ताजबंद येथील स्वामी विवेकानंद विद्यालय येथे तालुका स्तरीय शालेय मैदानी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये किलबिल नॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पुढील विद्यार्थि पात्र ठरले आहेत.14 वर्षाखालील वयोगटात 100 मीटर रिले गटात जान्हवी पाटील, सना बागवान, वैष्णवी सुर्यवंशी, स्वराली कोदळे प्रथम तर 100 मीटर धावणे स्पर्धेत वैष्णवी सूर्यवंशी प्रथम तर 80 मीटर हर्डल्स मध्ये इफराह पठाण प्रथम शर्वरी मेनकुदळे द्वितीय आली. 200 मीटर धावणे स्पर्धेत स्वराली कोदळे द्वितीय आणि गोळा फेक,लांब उडी यात समिक्षा पुणे,वैष्णवी सुर्यवंशी द्वितीय तर 17 वर्षाखालील वयोगटातील 400मीटर रिले गटात साक्षी सोनकांबळे, निधी भुतडा, महेक बागवान, गीता दिंडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला तसेच थाळी फेक मध्ये महेक बागवान प्रथम तर मुंढे संचीता द्वितीय तसेच 800 मी.धावणे स्पर्धेत महेक बागवान द्वितीय तर 100 मी. धावणे स्पर्धेत साक्षी सोनकांबळे प्रथम आणि लांब उडीमध्ये गीता दिंडे प्रथम, 400 मी धावणे यामध्ये साक्षी सोनकांबळे ही द्वितीयतरी वरील सर्व खेळाडूंचे व क्रीडा शिक्षक विशाल सरवदे, इरफान अकोले, अभिजित बी. एल, मधुकर दासरे, शुभम गुंजरगे यांचे मार्गदर्शन मिळाले. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले मुख्याध्यापक संतोष पाटील, पर्यवेक्षक महावीर गोडभरले यांनी शाळेच्या वतीने अभिनंदन करून पुढील जिल्हास्तरिय स्पर्धाकरीता शुभेच्छा दिल्या.
