प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचा सुनील खानापूरकर यांच्या हस्ते सत्कार
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डी.लिट. ही सर्वोच्च मानद पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष स्व.ॲड.बळवंतराव पाटील खानापूरकर यांचे चिरंजीव सुनील पाटील खानापूरकर व मुख्याध्यापक रामभाऊ हडोळे यांनी सत्कार करून अभिनंदन केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आदि क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन अमेरिका येथील सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेच्या वतीने त्यांना उच्च शिक्षण क्षेत्रातील डी. लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानीत करण्यात आले. याबद्दल सुनील पाटील खानापूरकर व विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीरचे मुख्याध्यापक रामभाऊ हडोळे यांनी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रोफेसर डॉ.अनिल मुंढे, डॉ. सतीश ससाणे, डॉ. पांडुरंग चिलगर, कार्यालय प्रमुख प्रशांत डोंगळीकर आदी उपस्थित होते.
