महात्मा फुले महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियानास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी अभियान शिबिर दि. ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या दरम्यान उत्स्फूर्त प्रतिसादात घेण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जिल्हाधिकारी कार्यालय लातूर यांच्या निर्देशानुसार महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्राचार्य तथा नोडल अधिकारी डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या तीन दिवसीय नवीन मतदार नोंदणी अभियान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानाकरिता तहसील कार्यालय अहमदपूरच्या वतीने बीएलओ जाधव डी.जी., गायकवाड पी.एस., पाटील एम. एस. यांच्यासह महात्मा फुले महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या अभ्यास केंद्राच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमधिकारी डॉ. संतोष पाटील, प्रो.अनिल महाराज मुंढे आदी परिश्रम घेत आहेत. या शिबिरांतर्गत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून हे शिबिर यशस्वी केले.
