महात्मा फुले महाविद्यालयाच्या ‘मिया-वाकी’ प्रकल्पास सुनील खानापूरकर यांची भेट

महात्मा फुले महाविद्यालयाच्या 'मिया-वाकी' प्रकल्पास सुनील खानापूरकर यांची भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात लातूर जिल्ह्यातील पहिला ‘मिया- वाकी’ अर्थात आनंद घनवन हा प्रकल्प राबविला. या प्रकल्पास किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे पहिले अध्यक्ष स्वर्गीय ॲड. बळवंतराव पाटील खानापूरकर यांचे चिरंजीव सुनील पाटील खानापूरकर यांनी भेट देऊन या उपक्रमांचे कौतुक केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल नेतृत्वाखाली महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘फुले पॅटर्न ‘ निर्माण केला. गुणवत्ता, सांस्कृतिक, साहित्य, क्रीडा, सामाजिक अशा विविध क्षेत्राबरोबरच पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याचे ओळखून राजमाता जिजाऊ उद्यान तसेच ‘मिया-वाकी’ हा प्रकल्प हाती घेऊन पूर्ण केला. विविध उपक्रमा बरोबरच मिया- वाकी प्रकल्पाची पाहणी सुनील पाटील खानापूरकर यांनी केली. तसेच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रात महाविद्यालयाचा वाढत असलेला लौकिक याबद्दल कौतुक केले.

यावेळी प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिकेची डी.लीट. ही सर्वोच्च पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीरचे मुख्याध्यापक रामभाऊ हाडोळे हे होते. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रो. डॉ. अनिल मुंढे, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील आदिंची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!