महात्मा फुले महाविद्यालयात डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना येथील महात्मा फुले महाविद्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अभिवादन सभेला राष्ट्रवादी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष कपिल बिरादार, सुधीर भोसले, अरविंद पदातुरे यांच्यासह महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, डॉ. सतिश ससाणे, डॉ. मारोती कसाब, प्रा. आतिश आकडे, प्रा. प्रकाश गायकवाड, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांच्यासह सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
