अहमदपूर येथे लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार, माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आ. बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अहमदपूर येथे लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार, माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आ. बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे लोकनेते खासदार शरदचंद्रजी पवार, माजी मंत्री बाळासाहेब जाधव व आमदार बाबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सायंकाळी पाच वाजता ‘शरदाचे चांदणे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये ‘निमंत्रितांचे कवी संमेलन’ या कार्यक्रमात अध्यक्ष कवी एन.डी राठोड, सहभागी कवी हास्य सम्राट रमेश गिरी नांदेड, अता हैद्राबादी, खटपट भैसवी (तेलंगणा), बजरंग पारिख नांदेड, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे, बालाजी मुंडे प्रा. अनिल चवळे, प्रा. डॉ. मारुती कसाब, वैजनाथ गीते, रंजना गायकवाड, वर्षा माळी, मीना तौर, अल्तमश तांबोळी, यांचा सहभाग असणार आहे.

तसेच ‘स्वर बहार’ या कार्यक्रमांमध्ये जुन्या नव्या गीतांचा बहरदार मैफील होणार असून यामध्ये प्रा. विजय खानापुरे, संगीता सुतार, उत्तम वाडेकर, मो आरेफ मुल्ला, शेख माहीन आदींचा सहभाग असणार आहे. व तसेच या बहारदार कार्यक्रमांमध्ये ‘ढोलकी झाली बोलकी’ या कार्यक्रमात ढोलकी सम्राट, सोलो ढोलकी वादक राजू सोनकांबळे यांचेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून या बहारदार कार्यक्रमाचा अहमदपूर व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घेण्याचे संयोजन समितीच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.

About The Author

error: Content is protected !!