‘न’… ‘ना’… च्या पाढ्याने माळेगावात ‘गाढवां’च्या बाजारावर नांगर फिरवला…?

'न'… 'ना'… च्या पाढ्याने माळेगावात 'गाढवां'च्या बाजारावर नांगर फिरवला…?

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

गर्दभ राजांच्या नगरीतून

लोहा,
या वर्षी सोयाबीन नाही… म्हणून हातात पैसा नाही… त्यामुळे यंदा कमीच मार्केट नाही… शिवाय नदीला पाणी नाही… या ‘न’… ‘ना’… च्या पाढ्यामुळे या वर्षी माळेगावच्या गाढव बाजारातल्या नगरीत खरेदी विक्रीवर ‘नांगर फिरला’ गेला असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया गाढव विक्रेत्यांनी दिल्या.
या वर्षी माळेगाव यात्रेत गाढव बाजार सुरूवाती पासूनच ब-या पैकी पण जेमतेमच होता… बाजारात कर्नाटक… आणि महाराष्ट्रातल्या गाढव विक्रेते… व खरेदीदारांची गर्दी होती… यावर्षी एकंब्याहून पिंटू हुल्लप्पा… सावरगाव नाईकचे नागनाथ तेलंगे… यांच्यासह उदगीर … लातूर आदि भागातून आपले गर्दभ घेऊन माळेगावातल्या गाढव बाजारात विक्रीसाठी घेऊन आले होते…!
या वर्षी गाढव विक्रीला खरेदीदारांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही…त्याचे कारण म्हणजे…या वर्षी हाताला सोयाबीन फारसे लागले नाही… मार्केट ही नाही… शिवाय नदीला पाणी नाही…हा सारखा ‘न’…’ना’… चाच पाढा वाचला जात आहे … मग कुठले गाढव विकले जातील…?गाढवाच्या पाठीवर पाणी आणण्यासाठी नदिला पाणी नाही…मग गाढव खरेदीचा ‘गाढव’ पणा कोण करणार…?असा उलट सवाल मारोती येलकट यांनी केला.
करखेली जि. लातूर येथून मारोती येलकट कुंभार यांनी ७०गाढवं घेऊन आले होते… पैकी ३०गाढवं विकली गेली… आता ४०गाढवं विकली गेली…आता या गाढवांची विक्री होणे शक्य नाही… गाढवाचा बाजार उडाला… खरेदीदार आता येत नाहीत… आज किंवा उद्या राहिलेले आम्ही चार- पाच जण जाणार आहोत…!
यावर्षी गाढवांना काय भाव मिळाला…? असे विचारले असता ते म्हणाले की…२०हजारांपासून ५० हजारांपर्यंत गाढव विकले गेले… गाढव बघून त्याची किंमत केली जाते…! पण,या वर्षीच्या माळेगावच्या यात्रेत गाढव बाजारावर नांगर फिरला असल्याची तीव्र प्रतिक्रिया गाढव विक्रेत्यांनी दिली.

About The Author

error: Content is protected !!