उदगीर येथे सक्षम (समदृष्टी,क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ) चे जिल्हा अधिवेशन

उदगीर येथे सक्षम (समदृष्टी,क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ) चे जिल्हा अधिवेशन

एक पाऊल दिव्यत्वाकडे

उदगीर (एल.पी.उगीले) : सक्षम समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडल ही एक सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्ती च्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे एकमेव राष्ट्रीय संघठन आहे. हे संघठन सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तीचे शैक्षणिक, आरोग्य, व पुनर्वसनासाठी कार्य करते.

सामान्य व्यक्ती व विशेष गरजा असलेल्या व्यक्ती एकत्र येऊन आत्मसन्मानाने व स्वावलंबी जीवन जगण्यासाठी , आणि आपल्या राष्ट्रांच्या पुनर्निर्माणासाठी दिव्यांग व्यक्तींचा सक्रिय सहभाग असावा. या उद्देशाने काम करणारी सक्षम संस्था आहे.

त्याचाच एक भाग म्हणून दर तीन वर्षानी सक्षमचे जिल्हास्तरीय अधिवेशन घेण्यात येत असते. यावेळी हे अधिवेशन स्वामी विवेकानंद वसतिगृह ,जळकोट रोड, उदगीर जि. लातूर येथे रविवार दि. २२/०१/२०२३ रोजी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात दिव्यांग क्षेत्रातील नामवंत विचारवंतांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तरी, लातूर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींनी व त्यांच्या पालकांनी अधिवेशनात सहभाग नोंदवावा, असे आवाहन सक्षमचे जिल्हा अध्यक्ष डॉ शिवाजी काळगे , जिल्हा सचिव दिपक क्षिरसागर(सं.क्र.९४०४१६०४४१), उदगीर सक्षम अधिवेशन समिती संयोजक डॉ कालिदास बिरादार, सहसंयोजक सतिष केंद्रे, सतिश पाटील, डॉ. संजय कुलकर्णी, डॉ दत्ता पाटील टाकळीकर, शंकर लासुणे, डॉ. संजय तेलंग , प्रशांत मांगूळकर,व किरण सनगले यांनी केले आहे. अधिवेशनात सहभागी होण्यासाठी बस्वराज पैके (संपर्क क्र. ९०७५३०६२९९) व पद्माकर तोगरे ( संपर्क. क्र.९११९५२१५१० ) यांच्या शी संपर्क साधावा.

About The Author

error: Content is protected !!