मतदार संघातील ३१ गावात होणार मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतुन शेत पानंद रस्ते

मतदार संघातील ३१ गावात होणार मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतुन शेत पानंद रस्ते

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची माहिती
उदगीर (एल.पी.उगीले) : आपल्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधावर जाण्यासाठी रस्ता असावा, म्हणून शासनाच्या योजनेतून मतदार संघातील ३१ गावामध्ये जवळपास ६२ किलोमीटर पर्यंतचे रस्ते माजी रोजगार हमी मंत्री तथा उदगीरचे आ. संजय बनसोडे यांच्या प्रयत्नातुन मंजूर करण्यात आले आहेत.

ग्रामीण भागात शेतकरी बांधवांसाठी आपल्या शेतीच्या बांधावर जाण्याकरिता रस्ता असावा म्हणून आमदार संजय बनसोडे यांनी मतदारसंघातील विविध गावची माहिती घेऊन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह तेथील अडचणी असणाऱ्या ग्रामस्थांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याकरिता शासन स्तरावर पाठपुरावा करून मतदार संघातील जनापूर या गावात ३ किलोमीटरचे ३ रस्ते तर मल्लापूर २ रस्ते २ कि.मी., हेर १ रस्ता १ कि.मी., गंगापुर १ रस्ता २ कि.मी., हकनकवाडी २ रस्ते २ कि.मी., अनुपवाडी १ रस्ता दिड कि.मी., शंभूमरगा १ रस्ता २ कि.मी., चिघळी १ रस्ता २ कि.मी., नागलगाव २ रस्ते ४ कि.मी., मेवापुर १ रस्ता २ कि.मी., जकनाळ १ रस्ता २ कि.मी., गुट्टेवाडी १ रस्ता २ कि.मी., अरसनाळ १ रस्ता दिड कि.मी., येणकी १ रस्ता २ कि.मी., कल्लुर १ रस्ता २ कि.मी., अनुपवाडी १ रस्ता २ कि.मी., कोळनुर २ रस्ते ३ कि.मी., लोणी २ रस्ते, ४ कि.मी., धामनगाव १ रस्ता दिड कि.मी., हंडरगुळी २ रस्ता २ कि.मी., दिग्रस १ रस्ता दिड कि.मी., देवर्जन १ रस्ता दिड कि.मी., भाकसखेडा १ रस्ता अर्धा कि.मी., कोदळी १ रस्ता २ कि.मी., बामणी २ रस्ते ४ कि.मी., माळहिप्परगा १ रस्ता २ कि.मी., फतरुतांडा १ रस्ता १ कि.मी., मलकापूर १ रस्ता १ कि.मी., रावणगाव १ रस्ता दिड कि.मी., शिरोळ १ रस्ता दिड कि.मी., मंगरुळ १ रस्ता १ किलोमीटर असे एकुण मतदार संघातील ३१ गावासाठी ६२ किलोमीटरचे रस्ते मंजूर करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे. या मतदार संघातील ३१ गावात मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतुन शेत पानंद रस्ते होत असल्यामुळे शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

About The Author

error: Content is protected !!