चामले यांच्या नेतृत्वाखाली खरेदी विक्री संघाचे कार्य उल्लेखनीय – राजाभाऊ तिमाटे
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथे कार्यरत असलेले स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे कार्य, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक भरतभाऊ चामले यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत उत्कृष्टपणे चालू आहे. या खरेदी विक्री संघाचा आदर्श इतर खरेदी-विक्री संघांनी घ्यावा. असे आवाहन वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ तिमाटे यांनी केले.
ते उदगीर येथील स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका सहकारी खरेदी विक्री संघास सदिच्छा भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते. याप्रसंगी तालुका खरेदी विक्री संघाचे जेष्ठ सदस्य विजयकुमार पाटील बामणीकर यांच्या हस्ते माजी आमदार राजाभाऊ तिमाटे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर उदगीर तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले तसेच जनार्दन शिंदे, नारायण पेंटर, विष्णू चामले, हनुमंत मुंडे यांच्यासह उदगीर व्यापार पेठेतील प्रतिष्ठित व्यापारी आणि खरेदी विक्री संघाचे कर्मचारी उपस्थित होते.
