श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी – आ. रमेशआप्पा कराड

श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांची आठवण कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारी - आ. रमेशआप्पा कराड

लातूर (एल.पी.उगीले) : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवण कार्यकर्त्यांना काम करण्याची ऊर्जा देते तसेच प्रेरणास्त्रोत म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे विचार भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा विधान परिषदेचे सदस्य आमदार रमेश आप्पा कराड यांनी व्यक्त केले. ते श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रथमतः अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड, भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, खा. सुधाकर शृंगारे यांनी विनम्र अभिवादन केले.

भारतीय जनसंघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षपद भूषविलेल्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कवी मनाचे होते. त्यांनी पाच दशके संसदेत सक्रिय राहून विरोधी पक्षनेता, परराष्ट्रमंत्री आणि देशाचे तीन वेळा पंतप्रधान म्हणून काम केले आहे. अटलजींच्या जन्मदिनी भाजपाच्या वतीने सुशासनदिन साजरा केला जातो.

लातूर येथील भाजपाच्या संवाद कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ रमेशआप्पा कराड, मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे, मराठवाडा शिक्षक मतदार संघातील भाजपाचे उमेदवार किरण पाटील, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, रामचंद्र तिरुके, अशोक काका केंद्रे, त्र्यंबक आबा गुट्टे, विक्रम काका शिंदे, प्रा. विजय क्षीरसागर, ज्ञानेश्वर चेवले, भारतीय जनता पार्टीचे उदगीर तालुका अध्यक्ष बसवराज रोडगे, बालाजी गवारे यांच्यासह अनेकांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

About The Author

error: Content is protected !!