विद्युत कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणार – आमदार बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : विद्युत कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न असून ते सोडविण्यासाठी विधानसभेत मांडू असे प्रतिपादन अहमदपूर- चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी मेळावा व नूतन सदस्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
शहरातील यश हॉटेल येथे १४ मार्च रोजी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.संजय घोडके तर व्यासपीठावर प्रेमानंद मौर्य, एस.के. हणवंते, संजय मोरे, दिलीप भोळे, नामदेव पवार, वाय.के.कांबळे, नवनाथ पोटभरे, गणेश सामसे, विष्णू ढाकणे, बप्पा वडमारे, सोमनाथ मठपती, अनंत चवरे, सिद्धार्थ पाटील, आर. एस. गायकवाड ,जयंत कांबळे, संजय नाटकरे ,सत्यप्रकाश कांबळे, संजय सगर, दयानंद कांबळे, कल्याण मस्के, मुजम्मिल शेख, दामोदर गायकवाड, ज्ञानेश्वर कांबळे, बी.एस.आगवाणे, बापू जगदे,एम.आर.आखंड, मनोज बनशेळकीकर आदींची उपस्थिती होती. यावेळी लातूर मंडळातील नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. एन.जी.जोरोंडे, प्रेमानंद मौर्य, नवनाथ पोटभरे सुरेश ढवळे आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. डॉक्टर संजय घोडके यांनी अध्यक्षीय समारोप केला यावेळी बोलताना त्यांनी बहुजन समाजातील कर्मचाऱ्यांच्या समस्या व संघटनेची भूमिका याबद्दल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक बालाजी कांबळे यांनी तर व आभार आर.एस. गायकवाड यांनी मानले यावेळी नूतन ४० कर्मचाऱ्यांनी संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमांचे संयोजक सुर्यकांत ढवळे,बालाजी कांबळे हे होते.