नांदेड येथील डॉ.ऋषिकेश माहेश्वरी यांचा इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसच्या वतीने सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : नांदेड येथील सुप्रसिद्ध मधुमेह व थायरॉईड तज्ञ डॉ.ऋषिकेश माहेश्वरी यांनी उदगीर येथील आदर्श शैक्षणिक संकुल म्हणजेच इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट दिली .त्यावेळी क्लासेसच्या वतीने क्लासेसचे मार्गदर्शक प्रा.गुंडप्पा अमृतराव पटणे, मार्गदर्शिका सौ.नागीनबाई गुंडप्पा पटणे व संचालक प्रा.सिद्धेश्वर गुंडप्पा पटणे यांच्या हस्ते डॉ.ऋषिकेश महेश्वरी यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रा.गुंडप्पा पटणे सर म्हणाले की, नांदेड येथील अतिशय तज्ञ व आपल्या उपचाराने मधुमेह व थायरॉईडच्या रुग्णांना नवसंजीवनी देणारे डॉ.ऋषिकेश माहेश्वरी हे उदगीर येथील परभणीकर हॉस्पिटलला दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी भेट देतात, तरी या तज्ञ डॉक्टर साहेबांचा व त्यांच्या योग्य अशा उपचारांचा उदगीर येथील मधुमेह व थायरॉईडच्या रुग्णांनी लाभ घ्यावा. असे आवाहन केले.
सत्काराला उत्तर देताना डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी यांनी सांगितले की, इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस हे उदगीर शहरच नव्हे तर मराठवाड्यातील एक ख्यातनाम नाव आहे माझ्यासारख्या सामान्य डॉक्टरांचा सत्कार अशा मान्यवरांच्या हस्ते होणे म्हणजे मी माझे भाग्य समजतो. माझ्यासारखे हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियर्स यांनी घडवले ते पटणे पिता पुत्र संपूर्ण मराठवाड्यात नामांकित आहेत त्यांच्या प्रभावशाली शिकवणीने कित्येक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासोबतच विद्यार्थ्यांच्या जाणीवा प्रगल्भ करणे त्यांना समाजाभिमुख करणे या उद्देशाने विविध उपक्रमही इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस मध्ये राबवले जातात हे विशेष आहे. या गोष्टीचा मला अभिमानही आहे असेही डॉक्टर माहेश्वरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. सिद्धेश्वर पटणे यांनी केले आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून इच्छापूर्ती कोचिंग क्लासेस च्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक कार्याच्या संदर्भात माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रा. नंदकुमार पटणे यांनी केले.
