लातूर जिल्हा बँक ए. टी. एम मोबाईल कँश व्हँन द्वारे लवकरच ग्राहकांना सेवा देणार

लातूर जिल्हा बँक ए. टी. एम मोबाईल कँश व्हँन द्वारे लवकरच ग्राहकांना सेवा देणार

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची माहिती

लातूर (प्रतिनिधी) : राज्यात जिल्हा सहकारी बँकांमध्ये अग्रगन्य असणारी लातूर जिल्हा बँकेने ग्राहकाला अधिक चांगली व घरपोच सेवा मिळावी यासाठी ए.टि.एम. मोबाइल कँश व्हँन द्वारे ग्रामीण भागात सेवा देण्याचा निर्णय घेण्यात आला असुन प्रायोजिक तत्वावर 2 मोबाइल व्हँन द्वारे सेवा देण्यासाठी गुरुवारी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री बँकेचे मार्गदर्शक दिलीपराव देशमुख यानी गुरुवारी बँकेच्या सभागृहात बैठकीत बोलताना दिली आहे या निर्णयामूळे लोकाना आता जलदगतीने पैसे काढणे व भरण्याची सुविधा मिळनार आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे हे होते.

पूढे बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले की संगणक युगात जिल्हा बँक वेगवेगळे निर्णय घेत सभासद ग्राहकाला चांगली सेवा देण्यासाठी हे पाऊल उचलले असुन ग्रामीण भागात जिथे बैंक नाही किंवा एखाद्या ग्राहकाला दुसर्या गावात खाते असले तरी ऐ.टी.एम द्वारे या व्हँन द्वारे जागेवरच पैसे मिळतील तसेच निराधार, बचतगट, सेविंग खातेदार याना ही सेवा जागेवर मिळनार आहे याचा अधिक फायदा जेष्ठ नागरिक, निराधार, पेन्शनर, सर्वसामान्य लोकाना बँकेत चकरा किंवा दुसर्या गावात पैसे काढायला जायची गरज पडनार नाही असे ते यावेळी म्हणाले.

यावेळी बँकेच्या मुख्यालयात संचालक मंडळाच्या बैठकीला बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्विराज सिरसाठ, संचालक तथा आमदार बाबासाहेब पाटील, संचालक भगवान पाटील विजयनगरकर, अँड प्रमोद जाधव, एन आर पाटील, व्यंकट बिरादार, सुधाकर रुकमे, सन्चालीका सौ शिवकन्या पिंपले, सौ स्वयंप्रभा पाटील, जिल्हा उपनिंबंधक समृत जाधव, नाबार्ड चे मनोज रायवाड, जी पी मिन्ज, कार्यकारी संचालक हनमंत जाधव, विविध खाते प्रमूख उपस्तीत होते यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

नाबार्ड कडुन लातूर जिल्हा बँकेचे कौतुक

या बैठकीला उपस्तीत असलेले नाबार्ड चे रायवाड यानी लातूर जिल्हा बँकेने उत्कुष्ठ ठेवी, नेट बँकिंग, ऑनलाइन सेवा ग्राहकांना देवून चांगला उपक्रम राबवला असुन त्यानी यावेळी लातूर बँकेचे कौतूक केले आहे.

About The Author