३१ लाख ५० हजाराचा अवैद्य गुटखा जप्त
उप-विभागीय पोलिस अधिकारी बलराज लंजिले यांच्या पथककाची विशेष कामगिरी
अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील वंजारवाडी पाटी लगत असलेल्या मदन मुसळे यांच्या आखाड्यावरील गोडाऊन मध्ये राज्य शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची साठवन केली असल्याच्या गुप्तदाराच्या गुप्त माहीती वरुन पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उप- विभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांच्या पथकाने सदरील गोडाऊन वर छापा टाकून तब्बल ३१ लाख ५० हजाराचा अवैद्य गुटखा जप्त करण्यात आला असुन किनगांव पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की,अहमदपूर तालुक्यातील वंजारवाडी पाटी लगत असलेल्या मदन मुसळे यांच्या आखाड्यावरील गोदामामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची साठवन केली असल्याची गुप्तदाराने दिलेल्या गुप्त माहीतीवरून पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखी उप -विभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले यांनी तात्काळ पि.एस आय गुटे, रेचवाड, नरहरे,गुट्टे, होमगार्ड गंगथडे, मुंडे आदी कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून दि २४ डिसें रोजी दुपारी १.४५ वाजता सदरील गोडाऊन वर छापा टाकला असता ३० मोठे पांढऱ्या रंगाचे गोवा गुटख्याने ज्यामध्ये प्रत्येक मोठ्या पोत्यामध्ये छोटे सहा बॅग प्रत्येक बॅगेत गोवा गुटख्याचे ५० पॅकेट ज्याची प्रत्येक पॉकीटची किंमत ३५० रू प्रमाणे अशी एकुण मोठ्या पोत्याची किंमत १ लाख ५ हजार रुपये प्रमाणे ३० पोत्याची एकुण अंदाजे किंमत ३० लाख ५० हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन सदरील प्रकरणात राजु गुरूलिंगअप्पा हामणे (रा सुमठाना ता अहमदपूर), सुधाकर माणिक पुट्टेवाड (रा नळेगाव ता बोथ जि अदिलाबाद), मदन मुसळे (रा सुमठाना) यांच्या विरूद्ध किनगाव पोलीस स्टेशन येथे फिर्यादी पोहेकॉ नरसिंग नरहरे यांच्या फिर्यादीवरून गुरनं १७५/२० कलम १८८,२६९,२७२,२७३,३२८,१२० ब भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास किनगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक खुब्बा चव्हाण हे करीत आहेत. तपासकामी बिट जमादार धुळगुंडे व महेबुब शेख हे मदत करीत आहेत.