अजित पाटील प्रिमिअर लिग-2020 च्या स्पर्धेत श्रीकांत क्रिकेट अकॅडमीचा संघ विजयी

अजित पाटील प्रिमिअर लिग-2020 च्या स्पर्धेत श्रीकांत क्रिकेट अकॅडमीचा संघ विजयी

लातूर (प्रतिनिधी) : अजीत प्रिमिअर लिग-2020 या राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा 21 ते 26 डिसेंबर या कालावधीत होत आहेत. या स्पर्धेचे आयोजन युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर व अराईज अकॅडमी,लातूरच्यावतीने करण्यात आले असून या स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशीच्या सामन्यात 1 ते 4 च्या सत्रामध्ये एस.के. हिटर्स विरूध्द श्रीकांत क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये श्रीकांत क्रिकेट अकॅडमीने 18 ओव्हर मध्ये 4 विकेट घेवून एस.के हिटर्स या टिमवर दनदणीत विजय मिळविला. यामध्ये सामनावीर पुरस्कार देवून आशिष सुर्यवंशी यांना या खेळाडूला नगरसेविका रागिणीताई सतिष यादव यांच्याहस्ते 1 हजार रूपये रोख व चषक देवून सन्मानित करण्यात आले.

अजित प्रिमीयर लिग-2020 या स्पर्धेत दयानंद महाविद्यालयाच्या सुरू झालेल्या आहेत. या स्पर्धेच्या तिसर्‍या दिवशी सकाळी 9 ते 12 यावेळेत झालेल्या बी.एम.एस.ए. विरूध्द पाटील वारियर्स यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात पाटील वारियर्स टिमने विजय मिळविला. बी.एम.एस.ए. या टिमने 20 ओव्हर मध्ये 153 धावा केल्या. तर पाटील वारियर्स टिमने 17 ओव्हरमध्ये उत्कृष्ठ खेळी करत विजय मिळविला. या टिमच्या संदेश खंडगावकर याने 90 धावा केल्या. त्यामुळे या खेळाडूला 1 हजार रूपये रोख व चषक देवून सन्मानित करण्यात आले. तर दुपारी 1 ते 4 च्या सत्रामध्ये एस.के. हिटर्स विरूध्द श्रीकांत क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये स्पर्धा सुरू झाली. स्पर्धेच्या प्रारंभी भाजपा युवा मोर्च्याचे संघटन सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे, भाजपा युवा मोर्च्याच्या विधी आघाडीचे प्रमुख अ‍ॅड.प्रकाश काळे व भाजपा युवा मोर्च्या जिल्हा कार्यकारीणी सदस्य सिध्दाजी पवार यांच्या उपस्थितीत नाणेफेक करण्यात आली. यामध्ये टॉस जिंकून एस.के. हिटर्स या टिमला पहिल्यांदा फलंदाजी मिळाली. एस.के.हिटर्स या टिमने 20 ओव्हरमध्ये 138 धावा केल्या. यामध्ये आनंद रेडीवार याने 62 धावा केल्या. तर यश लोकरे याने 28 धावा केल्या. तर एस.के. हिटर्स विरूध्द असलेल्या श्रीकांत क्रिकेट अकॅडमीच्या टिमने 18 ओव्हरमध्ये 4 विकेट घेवून एस.के.हिटर्स या टिमवर दनदणीत विजय मिळविला. यामध्ये आशिष सुर्यवंशी या खेळाडूला सामनावीर होण्याचा मान मिळाला. त्यामुळे नगरसेविका रागिणीताई सतीश यादव यांच्याहस्ते 1 हजार रूपये रोख व चषक देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी अजित प्रिमीयर लिग -2020 चे आयोजक व भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व खेळाडूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author