डी.सी.सी.टिमवर स्पार्टन्स क्रिकेट क्लबचा तीन गडी राखून दनदणीत विजय
अजित प्रिमीयर लिग-2020ः बी.एम.सी.सी.टिमवर भाऊपेठ संघ ठरला लई भारी
लातूर (प्रतिनिधी) : येथील दयानंद महाविद्यालयाच्या स्टेडीयमवर अजित पाटील कव्हेकर टी-20 2020 च्या स्पर्धा मोठ्या जोशपूर्ण वातावरणात सुरू आहेत. यामध्ये चौथ्या दिवशी डी.सी.सी.लातूर विरूध्द स्पार्टन्स क्रिकेट क्लब यांच्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये स्पार्टन्स क्रिकेट क्लबने 18 ओव्हरमध्ये तीन गडी राखून डी.सी.सी.लातूर टीमवर दणदणीत विजय मिळविला यामुळे स्पार्टन्स क्रिकेट क्लबच्या माधव गोमारे या खेळाडूला सामनावीर पुरस्कार देवून अॅड.गणेश गोमचाळे यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले.
डी.सी.सी.लातूर विरूध्द स्पार्टन्स क्रिकेट क्लब यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यामध्ये डी.सी.लातूर या टिमने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. तर डी.सी.लातूर टीमने केलेल्या 113 धावांचे तोकडे आव्हान स्पार्टन्स क्रिकेट क्लबने 18 ओव्हरमध्ये तीन गडी राखून पूर्ण केले. स्पार्टन्स क्रिकेट क्लबच्या ऋषिकेश मस्के या खेळाडूने 39 धावा केल्या. तर स्पार्टन्स क्रिकेट क्लबच्या माधव गोमारे या खेळाडूला सामानवीर पूरस्कार देवून अॅड.गणेश गोमचाळे, राहुल पाटील तिर्थवाडीकर, अनिल पाटील रायवडीकर, भिमाशंकर गाढवे, गणेश गवारे, शिवद्पाल बायस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. तर पहिल्या सत्रामध्ये झालेल्या भाऊपेठ विरूध्द बी.एम.सी.सी.लातूर यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात बी.एम.सी.सी.लातूर या टिमवर भाऊपेठ या संघाने नऊ धावाने विजय मिळविला. प्रारंभी बी.एम.सी.सी.संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भाऊपेठ या संघाने 140 धावा केल्या. त्यास प्रतिउत्तर देत बी.एम.सी.सी.संघाने 131 धावा केल्या या मध्ये सुरज रेड्डी या खेळाडूने 52 धावा करून एकहाती झुंज दिली. परंतु भाऊपेठ या संघाने चुरशीची लढत देत हा सामना नऊ धावांनी जिंकला. यावेळी अराईज अकॅडमचीचे मिश्रा, अमृत सर, जाधव सर, यांची उपस्थिती होती.