महात्मा फुले महाविद्यालयाच्या एन. एस. एस. मध्ये रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबीर मौजे रुई दक्षिण ता. अहमदपूर जि.लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे. या दरम्याण घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या विशेष निवासी शिबिरा अंतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याचाच एक भाग म्हणजे माऊली ब्लड बँक लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी, रुई दक्षिण ग्रामस्थांनी रक्तदान करून आपले राष्ट्रीय दायित्व पार पाडले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी . कार्यक्रमाधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर, कार्यक्रमाधिकारी डॉ संतोष पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांच्यासह रुई गावचे ग्रामस्थ, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
