रंगकर्मी प्रतिष्ठानचे विविध क्षेञातील पुरस्कार जाहिर,२९ जानेवारीला होणार मान्यवरांच्या हस्ते वितरण,इनरव्हील क्लबचा विशेष गौरव,
उदगीर (एल.पी.उगीले) : रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक , शैक्षणिक, कला ,साहित्य ,क्रीडा क्षेत्रात भरीव कार्य करणार्या मान्यवरांना दिला जाणारा मानाचा पुरस्कार रंगकर्मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. बिभीषण मद्देवाड यांनी जाहीर केले. आरोग्य व सामाजिक कार्य डाॅ. रामप्रसाद लखोटिया, शैक्षणिक कार्य प्राचार्य डॉ. सुधीर जगताप उदगीर ,साहित्य व कला क्षेत्र गीतकार प्रा. डाॅ विनायक पवार पेण रायगड, गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे पोलादपूर रायगड, गटशिक्षणाधिकारी सतिश दर्शनवाड उमरखेड. यवतमाळ सामाजिक व शैक्षणिक कार्य प्रा राजशेखर सोलापूरे लातूर , शैक्षणिक कार्य राजेंद्र परतेकी चंद्रपूर , खडके अनिता मारुती औसा, लातूर. किरण जगदाळे उस्मानाबाद ,मंजुषा कुलकर्णी उदगीर ,ज्ञानेश्वर जवळे अहमदपूर ,ज्ञानोबा मुंडे उदगीर, गजानन देवकत्ते यवतमाळ , राजेश बोराटे ,साहित्य क्षेत्रातील कार्य रामकृष्ण अघोर सोलापूर ,सीमा संतोष शेलार खेड पुणे. आरोग्यक्षेत्र दिलीप बाबुराव कचरे , कलाक्षेत्र बाळकृष्ण गोविंद कांबळे निलंगा ,रणजीत वर्मा नांदेड ,क्रिडा क्षेत्र संतोष कदम अहमदपूर काॅमनवेल्थ सिल्वर मेडल विजेती ज्ञानेश्वरी शिंदे आदिना पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल ईनरव्हील क्लब ,उदगीर व कमांडट बि के सिंग यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी रघुकुल हॉल येथे संपन्न होणार आहे. आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव प्रसंगी होणार आहे. रंगकर्मी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवाचे आयोजन, लघुपट निर्मिती शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात अविरतपणे कार्य करत आहेत. विद्यार्थ्यांना व्यासपीठ देण्यासाठी रंगकर्मीच्या वतीने राज्यस्तरीय भव्य रंगभरण,चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन , विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी विज्ञान प्रदर्शन , पथनाटयातून पर्यावरण जनजागृती , व्यसनमुक्ती तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरींकापर्यत पोहचविण्याचे कार्य चालू आहे.
पुरस्कारमुर्तीचे अभिनंदन , रंगकर्मीचे अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड ,सचिव प्रा ज्योती मद्देवाड अ,ॅड विष्णू लांडगे ,अॅड महेश मळगे ,रसुल दा पठान, रविंद्र हासरगुंडे , रामदास केदार लक्ष्मण बेंबडे ,मारोती भोसले , महादेव खळूरे , संदीप मद्दे , सिद्घार्थ सुर्यवंशी , सचीन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर,,जहाँगीर पटेल , निता मोरे ज्ञानेश्वर बडगे ,विवेक होळसंबरे टी डी पांचाळ , बालाजी भोसले , अर्चना पाटील , केंद्रे ,नागनाथ गुट्टे आदीनी केले आहे