कासार सिरसीत रवीकुमार कांबळे यांचा निरोप समारंभ
कासार सिरसी ( बालाजी मिलगिरे) : येथील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल रवीकुमार कांबळे यांना फेटा, शाल, नारळ देऊन सत्कार करून निरोप समारंभ पार पाडण्यात आले.
रविकुमार यांनी येथे उत्तम कार्य बजावत तब्बल सात वर्ष निष्कलंक सेवा केले आहे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सीव्यसहायक म्हणून महत्वाचे काम पहिले आहे.
रविकुमार कांबळेसाहेब यांना या परिसरात पोलीस स्टेशन व जनते मधला दुवा असे समजले जात होता गरिबीची जाण असल्या कारणाने थेट जनतेमध्ये मिसळून असायचे “” खाकीत सुद्धा असतो माणुसकीचा झरा”” या म्हणीप्रमाणे त्यांच्याकडे पहिला कर्तव्य दुसरा माणुसकी भरभरून मनात भरलेला असायचं.
या निरोप समारंभ च्या अध्यक्षस्थानी येथील कर्तव्यदक्ष अधिकारी रेवनाथ डमाळेसाहेब, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागरसाहेब, येथील उपसरपंच बडेसाहेब लकडहारे , ग्रामपंचायत सदस्य वीरेश चिंचुनसुरे, विवेक कोकणे, सुरेश बरकंबे, मोनेश्वर पांचाळ,नारायण डोंबाळे,गिरीश चिंचनसुरे,पृथ्वीराज सरवदे ,अझहर सावकार भास्कर पाटील दिलीप माने महेश मामांळे,पत्रकार संतोष डांगे,तसेच कर्मचारी स्टॉप,शहरातील व परिसरातील लोक प्रतिनिधी मोठ्या संख्याने उपस्थितीत होते.
यावेळी अन्यजण पुढील वाटचालीस शब्द सुमनाने शुभेच्छा दिल्या
सत्काराला उत्तर देताना माझ्या कार्यकाळात अनेक अधिकारी लाभले सर्वजण माझ्यावर विश्वास दाखवले त्यांच्या विश्वासाला पत्र राहण्यासाठी मी प्रयत्न केला तसेच शहरातील व परिसरातील मित्र परिवारानी भरभरून प्रेम दिल त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे तसेच कासार सिरसीकर माझ्या जीवनात विसमरणीय राहतील असे म्हणत भावुक झाले.
सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य विवेकजी कोकणेसर यांनी केले.