पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन

चिंचवड/ पुणे : पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप हे अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. अश्यातच काही दिवसांपूर्वी पुन्हा त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

दि. 3 जानेवारी रोजी मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले आहे. जगताप यांच्या निधनामुळे पिंपरी चिंचवड शहरात तसेच चिंचवड मतदार संघात शोककळा पसरली आहे.

दुपारी ३ ते ६ यावेळेत पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी असेल. संध्याकाळी ७ वाजता अंत्यविधी पिंपरी गुरव येथे होईल.

About The Author

error: Content is protected !!