दर्जेदार शिक्षणामधुनच देशाचा विकास होईल – प्रा. गोविंद शेळके
अहमदपूर (गोविंद काळे) : आज काल शिक्षणाचा दर्जा घसरलेला असुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले तरच विद्यार्थ्यांची उन्नती होईल परिणामी देशाचा विकास होईल असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. गोविंद शेळके यांनी केले. ते येथील संस्कृति गार्डनमध्ये आयोजीत केलेल्या वर्ल्ड स्कुलच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात उद्घाटकीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. रविंद्र मंदाडे तर प्रमुख पाहुणे म्हणून इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा अॅड. महाजन मॅडम, डॉ. अंजली उगीले, डॉ. चंद्रकांत उगीले, संस्था सचिव वर्षा मंदाडे, तात्या पेट्रोल पंपाच्या प्रोपा. वर्षाताई शेळके आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. गोविंद शेळके म्हणाले की, देशाचा विकास करावयाचा असेल तर दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे, हे सांगत असताना दक्षिण आफ्रिकेतील एका विद्यापीठाच्या गेटवर लिहीलेल्या मजकुराचा हवाला देत सांगीतले की, एखादा देश उध्वस्त करावयाचा असेल तर अटम बॉंब, हायड्रोजन बाँब किंवा लांब पल्याच्या क्षेपणास्त्राची गरज नाही तर केवळ त्या देशात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा दर्जा घसरवला व परिक्षेत विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास उत्तेजन दिले तर अशा विद्यापीठातून बाहेर पडणाऱ्या डॉक्टरच्या हातून रोगी मरतील व इंजिअर च्या हातून बांधलेले रस्ते, तलाव, पुल लवकरच कोसळतील अशा विद्यापीठातून बाहेर पडलेले न्यायाधिश भ्रष्ट निघतील व न्यायव्यवस्था कोडमडेल अशा तऱ्हेने देश उद्धवस्त होईल. तसेच अशा विद्यापीठातून बाहेर पडलेल्या अर्थतज्ञाच्या हातून अर्थव्यवस्था कोसळेल आणी या सर्वांचा परिणाम म्हणून देश उद्धवस्त होईल, हे व्हायचे नसेल तर शैक्षणिक संस्था मधुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळाले पाहीजे व त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आटापीटा केला पाहीजे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा मंदाडे, सुत्रसंचलन व आभार विद्या मंदाडे यांनी मानले. या कार्यक्रमास पालकांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला.
