उपसरपंच पदी प्रयाग नावंदे यांची बिनविरोध निवड
उदगीर (एल.पी.उगीले) : तालुक्यातील मुदत संपलेल्या 26 ग्राम पंचायतिच्या निवडणूक पार पडल्या, यात तोंडार येथील निवडणूकही चुरशीची ठरली, सरपंच पदाची निवडणूक जनतेतुन निवड असल्याने भरत कोचेवाड यांची सर्व मतदारांनी निवड करुन भरघोस मतांनी विजयी केले. तर उपसरपंच पदाची निवड दि: ०३/१/२०२३ रोजी निवड झाली. यात फक्त एकाच उमेदवाराचा फार्म भरला गेला असल्यामुळे प्रयाग शिवलिंग नावंदे याची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व गावकरी, मित्र परिवारानी त्याचां सत्कार केला , या वेळी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजकुमार पटवारी, व्हा. चेअरमन बसवराज बिरादार ,शिवकुमार पांडे, बंडेप्पा मुळे,प्रल्हाद पाटील, विठ्ठल थोटे,निलप्पा बिरादार, मनोहर ढोबळे, रमेश करले ,माधव पाटील तर निवडणूक अधिकारी घंटेवाड , व ग्राम विकास अधिकारी मुंढे यांच्यासह गावकरी उपस्थित होते, या प्रसंगी उपसरपंच सह ग्रामपंचायतच्या इतरही सर्व विजयी उमेदवारांना फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकसंघ राहून वेगवेगळ्या लोककल्याणकारी योजना सोबतच गावच्या विकासाच्या योजना प्रत्यक्ष राबवून खऱ्या लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण सदैव प्रयत्न करू असे आश्वासनही याप्रसंगी सरपंच आणि उपसरपंच या दोघांनीही दिले.
तोंडार हे गाव उदगीर शहरा लगत असल्याने आणि मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी देखील आपापल्या परीने शक्ती लावून आपल्या पक्षाचे कार्यकर्ते कसे विजयी होतील यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
