देवणी तालुक्यात विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

देवणी तालुक्यात विविध ठिकाणी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी तालुक्यातील देवणी खु. येथे जि,प,प्रा,शाळेत व ग्रामपंचायत कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली, स्त्री शिक्षणाच्या जनक, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. सरपंच यशवंत कांबळे, मुख्याध्यापक कांत कांबळे ,अनिल कांबळे, मकबुल पठाण,केंद्रप्रमुख नरवटे के,एन,सहशिक्षक पुंड बि वाय,बिरादार एस पी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटिल, पत्रकार रणदिवे लक्ष्मण,सजय गरड,नागनाथ व्यजने,चांडेश्वर एस पी,तेजेवाड बि आर,अंगणवाडी सेविका सरोजा गायकवाड ,मदतनीस हौशाबाई सारगे,आयोध्या सूर्यवंशी, मनिषा बिरादार प्रेरिका,व ग्रामीण महिला विकास संस्थेच्या गावपातळीवर प्ररेक, प्ररिका यांच्या सहकार्याने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी युवक ,युवती,पुरुष ,महिला , सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!