नवीन वर्षाच्या स्वागताची उदगीर करांची अनोखी यशोगाथा, पन्नास युवकांचे रक्तदान

नवीन वर्षाच्या स्वागताची उदगीर करांची अनोखी यशोगाथा, पन्नास युवकांचे रक्तदान

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील तरुणाई गेली दहा वर्ष एक विधायक पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करत आहेत. पूर्ण जगभर विविध पद्धतीने नागरिक नव वर्षाचे स्वागत करतात,प्रामुख्याने रात्री बारा वाजता केक कापून,विविध रंगबिरंगी फटाके, मद्यपान करून धांगडधिंगा, डी जे नाच याचा समावेश दिसून येतो.

पोलिस व प्रशासन रात्रभर डोळ्यात तेल घालून कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी जागत असतात, उदगीर येथील नागरिकांनी मात्र नव वर्षाचे स्वागत गेली दहा वर्ष झाली रक्तदान करून करण्याचा संकल्प केला व आजतागायत तो संकल्प पूर्णत्वास नेेत आहेत.

या वर्षी राहुल अंबेसांगे मित्र मंडळ यांच्या वतीने हवा गजानंद,बिरादार रामकृष्ण,चंदेले आदर्श,ठाकूर राजासिंग, मिरजगावे शिवकांत,स्वामी सोमनाथ,बाळे तम्मा,शिंदे सुमित,चौधरी कैलास,सवाई अनमपारम,होनराव गणेश,हलमंडगे दिनेश,पांचाळ गणेश,आठाणे सचिन,शेख इम्रान,सोळनर बालाजी,पटवारी प्रमोद,काळगापुरे बबलु,रुपेश रापतवार यांनी रक्तदान करत नव वर्षाचे स्वागत केले.

सोबत विशाल जाधव पाटील या आपल्या मित्राच्या वाढदिवस निमित्त त्यांच्या मित्र परिवारातील पाटील संदीप,धुमाळे गणेश,पाटील विराज,मोरे कुमार,शेख गौस,बिरादार राहुल,पाटील शहाजी,पाटील सुषमा या रक्तदात्यांनी रक्तदान करत शुभेच्छा दिल्या.

उदगीर येथील ओमकार गांजूरे यांच्या कन्येचा पहिला वाढदिवस त्यांच्या मित्र परिवाराने व आचारे मित्र मंडळाने रक्तदान करून साजरा केला.या चिमुकलीच्या वाढदिवस निमित्त ओमकार गांजुरे,निलेश पांढरे,श्रावण बिराजदार,दिनेश तरवडे,अभिजित लातूरे,ओमकार बिरादार,ज्ञानेश्वर मोहिते पाटील,हरिश्चंद्र पाटील,संतोष आचारे,ओमकार निरणे यांनी रक्तदान करत शुभेच्छा दिल्या. व नव वर्षाचे स्वागत केले. उमर मनियार,शुभम तांबोळी,मारोती शिंगरूपे,योगेश पाटील,गोविंद पोतदार,संजय बिरादार,ज्ञानोबा पाटील,मारोती कोळी या तरुणांनी स्व इच्छेने पुढे येत नागप्‍पा अंबरखाने ब्लड सेंटर उदगीर येथे येऊन रक्तदान करत नव वर्षाचे स्वागत केले.

या आगळ्या वेगळ्या उत्सवाचे स्वागत करणाऱ्या सर्व तरुणाचे आभार ब्लड बँकेचे बी टी ओ डॉ. शेटकार यांनी केले. व या रक्त संकलनासाठी बँकेच्या वतीने सचिन कोनाळेअविनाश बिरादार,स्वामी सोमनाथ,रॉबिन कांबळे,सपना कांबळे,कल्पना लोणे,अनुराधा सोनटक्के विनायक टकटवळे,संगम स्वामी,अविनाश जयकर,कौशल्या कांबळे,मिलिंद रणवीर,उमाकांत पांचाळ,बालाजी खडकपुरे यांनी परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!