भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, सरचिटणीस तथा युवा मोर्चा प्रभारी विक्रांतदादा पाटील, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष राहूल लोणीकर, राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भारतीय जनता युवा मोर्चा लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजितभैय्या पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते अशा शब्दात तमाम हिंदूंच्या भावना दुखावणारे आणि छत्रपती संभाजी राजांच्या धर्मनिष्ठेवर बोट ठेवत त्यांच्या धर्मवीर उपाधीलाच आपल्या राजकीय फायद्यासाठी जाणीव पूर्वक विरोध केला त्याच्या निषेधार्थ आज लातुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे तीव्र आंदोलन करून अजित पवार यांचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
ज्या औरंगजेबाने आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर ४० दिवस अगणित अत्याचार करून त्यांची क्रूरपणे हत्या केली, ज्या औरंगजेबाने हजारो देवी देवतांची मंदिरे उध्वस्त केली, आया बहिणींवर अत्याचार करून जबरदस्ती ने धर्मांतरण केले त्या धर्मद्वेश्टा औरंगजेबाच्या विरोधात शेवटच्या श्वासापर्यंत झुंज देत आपल्या प्राणांची आहुती दिली पण आपला धर्म सोडला नाही अश्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अजित पवार यांनी केलेलं विधान हे लज्जास्पद व संतापजनक आहे छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते आणि ते कायम धर्मवीर च राहतील अजित पवार यांनी केलेल्या विधानाचा आम्ही भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस ॲड. गणेश गोजमगुंडे, संतोष ठाकुर, सागर घोडके, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकण, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष राजेश पवार, युवती प्रमुख ॲड.पुनम पांचाळ, मंडल अध्यक्ष ॲड.हरिकेश पांचाळ, कार्यालय प्रमुख आकाश बजाज, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आकाश जाधव, चिटणीस संतोष तिवारी, महादेव पिटले, ईश्र्वर सातपुते, राहुल भुतडा, सुनिल राठी, आदित्य फफागिरे, आकाश जाधव, आकाश पिटले, शुभम माळवदे, गौरव यादव, अभिजीत शिंदे, निखील शेटकार, कृष्णा सारगे, सूरज शिंदे, प्रेम चव्हाण, अजय जाधव, ओम ढेकरे, गणेश धोत्रे, गौरव यादव, यश इटकर, प्रशांत कालापुरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
