सामाजिक उपक्रमातून भरतभाऊ चामले यांचा वाढदिवस साजरा
उदगीर (एल. पी. उगिले) : महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ चामले यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या वतीने सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.
भरतभाऊ चामले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे निकटवर्ती असून सामाजिक जाणीव जोपासून आपला वाढदिवस साजरा करावा, हार, तुरे, शाल, श्रीफळावर खर्च न करता गोरगरिबांना सहकार्य करून वाढदिवस साजरा करावा. अशी भूमिका भरतभाऊ चामले यांची असल्यामुळे कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा केला आहे. अशी माहिती शेकापूर विविध विकास सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे यांनी दिली आहे.
प्रथमतः युवराज कांडगिरे यांच्या वतीने पांडुरंग निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांना निष्ठांन्न भोजन देऊन त्यांच्या समवेत आनंदोत्सव साजरा करत वाढदिवस साजरा केला. त्यानंतर मूकबधिर दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये म्हणून, आत्मविश्वास निर्माण करणारे प्रबोधनही करण्यात आले.
परमेश्वराने एखादी व्यंग दिले असले तरी तेवढीच अतिरिक्त ताकत इतर अवयवात दिलेली असते. त्याची ओळख करून दिव्यांगांनी मोठ्या आत्मविश्वासाने समाजासमोर जावे, असेही प्रबोधन करण्यात आले. याप्रसंगी युवराज कांडगिरे, संस्था अध्यक्ष विकासजी तपशाळे, राजकुमार चामले, सतीश पाटील मानकीकर, संतोष कोतलापुरे, अविनाश उगिले, बालाजी नादरगे, ेेे भूषण कानवटे, पंकज कलानी, पवन ढोबळे, विपुल सोनकांबळे, करण गायकवाड, विनीत पडिले, गोविंद चामले, कृष्णा कांडगिरे, राठोड देवकते, जाधव, पवार, लहाने इत्यादी शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू आलट यांनी केले.
