ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्यामलाल हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती श्यामलाल हायस्कूल मध्ये उत्साहात साजरी

उदगीर (प्रतिनिधी) : येथील श्यामलाल मेमोरियल हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामलाल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर होते तर प्रमुख उपस्थिती प्र. पर्यवेक्षक राहुल लिमये तसेच सर्व महिला शिक्षिका व्यासपीठावर उपस्थित होत्या.

शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर व जेठुरे शितल यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच सर्व महिला शिक्षिका व विद्यार्थी प्रतिनिधी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेतील विद्यार्थिनी चंदे वैष्णवी,घोरपडे स्नेहा, देवणे श्रुती, आवाळे वैष्णवी, गोंडगावे सिंधू, विभावरी चामले, साधना मजगे, सगर श्रुती, वडगावे माहेश्वरी या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेमध्ये प्रभावीरीत्या मनोगत व्यक्त केले तसेच शिंगडे संचिता,साईविश्व बिरादार या विद्यार्थ्यांनी अतिशय प्रभावीरीत्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. उत्कृष्ट भाषण केलेल्या या विद्यार्थ्यांना कावरे प्रमोद, घोळवे अविनाश, रोडगे शैलजा या शिक्षकांनी रोख पारितोषिक देऊन त्यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय समारोपामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आनंद चोबळे सर यांनी भारतातील पहिल्या महिला स्त्री शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य भारतीय समाजासाठी खूप मोठा आदर्श आहे त्यांनी भारतीय स्त्रियांना शिक्षणाची दारे खुले करून समाज उन्नती करण्याचे महान कार्य केले त्यांच्या समाजसेवेचा वसा घेऊन आपणही समाज उपयोगी कार्य करून आपला समाज,आपला देश अधिक विकसित होईल याकडे लक्ष द्यावे असे मनोगत व्यक्त केले.

संस्था सहसचिव श्रीमती अंजुमनीताई आर्य व संस्था पदाधिकारी यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व स्त्री शिक्षणाच्या महान कार्याचा वसा घेऊन आपण शिक्षण विषयक कार्य प्रभाविपणे करू असा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव हाके यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य उमाकांत सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

About The Author

error: Content is protected !!