कर्तुत्ववान महिलांचा सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सत्कार
उदगीर (एल.पी.उगीले) : लाल बहादूर शास्त्री विद्यालयात शिक्षक-पालक संघाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त कर्तृत्ववान महिलांचा सत्कार ठेवण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष अविनाश हेरकर तर प्रमूख पाहुण्या केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे होत्या.सत्कारमूर्ती मनिषा रत्नपारखी तर व्यासपीठावर उपमुख्याध्यापक अंबादास गायकवाड, पर्यवेक्षक बलभीम नळगीरकर तर सावित्रीबाईंच्या वेषभुषेत श्रद्धा उप्पे व संध्या मदने उपस्थित होते.
मिनाक्षी रत्नपारखी यांनी प्रतिकूल परिस्थितीत स्वतंत्र व्यवसाय उभा करून यशस्वी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख प्रतिभा मुळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. व भविष्यात सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर विश्वास ठेवून यशस्वी व्हावे.असे मार्गदर्शन केले.मनिषा रत्नपारखी यांनी आपला जीवनानुभव सांगून सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यामुळे मी यशस्वी स्त्री म्हणून समाजात वावरत असल्याचे सांगितले.श्रद्धा उप्पे व संध्या मदने यांनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलतेय’ हे एकपात्री नाटक सादर केले. अध्यक्षीय समारोप करताना अविनाश हेरकर यांनी शिक्षक, पालक संघाच्या वतीने क्रार्यक्रम घेत असल्यामुळे आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अश्र्विनी देशमुख, प्रास्ताविक कॄष्णा मारावार तर वैयक्तिक गीत प्रीती शेंडे यांनी म्हटले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक पालक संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
