“लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न”

“लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न”

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर नगरपरिषद द्वारे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती निमित्त दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत स्थापित महिला स्वयंसहाय्यता बचतगट, वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघ सदस्यासाठी “नयी चेतना: पहल बदल की” या अभियानाद्वारे लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनपर कार्यशाळा नगरपरिषद सभागृह येथे संपन्न झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांची उपस्थिती तर सहारा शहर स्तर संघाच्या अध्यक्ष संघमित्रा गवळे यांच्या शुभहस्ते क्रांत्रीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी केले. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याधिकारी शुभम क्यातमवार यांनी उपस्थित महिला सदस्यांना क्रांत्रीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जिवनकार्याविषयी माहिती देत. उपस्थित महिला सदस्यांना आपल्या पाल्यामध्ये भेदभाव न करता मुलगा किंवा मुलगी दोघांना देखील समान संधी उपलब्ध करून द्या, असे आवाहन केले.

“नई चेतना: पहल बदल की” लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने उपस्थित सदस्यांना आरोग्य, शिक्षण, स्वातंत्र्य, आर्थिक या सर्वच क्षेत्रात स्त्री –पुरुष समानता राखून लिंग आधारित भेदभाव दूर करावा. असे संतोष भुताळे तालुका व्यवस्थापक उमेद अभियान पंचायत समिती उदगीर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा थांबवण्यासाठी सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

महिला स्वयं सहाय्यता बचतगट यांनी लेखे अद्यावत महत्व, गटाने कर्ज प्रस्ताव कसा तयार करावा? गटांचे आर्थिक साक्षरता महत्व, कर्ज वितरण प्रक्रिया, कर्ज परतफेड महत्व, व्याज अनुदानाचा लाभ, या बाबत एचडीएफसी बँक कर्ज विभागाचे व्यवस्थापक अमित धात्रक यानी मार्गदर्शन केले.

तसेच अभियानातील २३ महिला बचतगट यांना एचडीएफसी बँकेच्या सहाय्याने एकूण ४७ लाख कर्ज उपलब्ध करून दिले. यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात ५ बचतगटांना कर्ज वितरण पत्रकाचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

महिला स्वयंसहायता बचत गटांना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत सविस्तर माहिती देत सदर योजनेचा लाभ सर्व बचतगटांनी घ्यावा. असे शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसूरकर यांनी उपस्थित सदस्यांना आवाहन केले.

कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक महेश कवटे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या समुदाय संसाधन व्यक्ती यांचे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर अभियान व्यवस्थापक विशाल गुडसुरकर, महारुद्र गालट. समुदाय संसाधन व्यक्ती अनिता चौधरी, सुवर्णा धुळेकर, स्मिता चव्हाण यांनी परिश्रम घेतले.कार्यकर्माचे सूत्रसंचलन शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांनी तर आभार प्रदर्शन विशाल गुडसुरकर यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!